Header Ads Widget

दमदार पोलीस अधिकाऱ्याची दमदार कामगिरी लोहा पोलिसांनी मारलेल्या जुगार अड्ड्याच्या धाडीत १ लाख ३३ हाजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त ७ आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू ?

          माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस ठाण्याच्या दमदार पोलीस अधिकाऱ्यानी दमदार कामगिरी करून  पोलिसांनी मारलेल्या जुगार अड्ड्याच्या धाडीत १ लाख ३३  हाजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त ७ आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आल्याची माहिती मिळते आहे
लोहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सुनेगाव ते हळद जाणारे पांदण रस्त्यावर लिंबाच्या झाडाखाली ७ जन बावन पत्त्याचा हार जितचा खेळ खेळत असल्या बाबत माहिती लोहा पोलिसांना मिळाली आहे

दबंग पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर हे ठाण्यात कार्यरत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रोडे यांच्यासह लाडेकर डफडे राठोड गुट्टे गिरे यांनी सदरच्या ठिकाणी धाड मारली आहे
जुगार अड्डयावर मारलेल्या धाडीत यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती असून तर इतर ४ आरोपी पोलिसांना पाहून घटनेच्या ठिकाणा हुन झाडी झुडपात पळून गेले असल्याचे सांगण्यात येते आहे

सदरील गुन्ह्या मध्ये पोलिसांनी डावा वरून बावन पत्त्याचे ११ कॅट बसायच्या दोन चटया रोख रक्कम दोन मोटार सायकली जप्त केल्या केल्याची माहिती आहे

ठाण्याचे फौजदार रोडे यांच्या फिर्यादी वरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे पोलीस स्टेशन लोहा येथे गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे कळते 

लोहा शहरा मध्ये लोहा पोलिसांनी एका जुगार आड्यावर छापा टाकून २ आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून २९ हाजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे



Post a Comment

0 Comments