लोकसभेच्या निवडणुकीचे कामे प्रशासनाला मोठया प्रमाणात लागले असताना सुद्धा नायागांवच्या कर्तव्य महिला तहसीलदारासह पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी यांचे उन्हाळ्याची नुकतीच चाहूल लागली असताना तालुक्यातील ८९ गावातील पाणी टंचाईकडे लक्ष ठेवले आहे
लोकप्रतिनिधीसह नायगाव तहसील प्रशासन व पंचायत समिती प्रशासने उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन तात्काळ बैठक लावून पाणी टंचाईवर तोडगा काढण्यात यावा असे जनतेचे मत आहे.
नांदेड जिल्ह्यात लोकसभेचे वारे वाहू लागत असल्यामुळे व उन्हाळ्याची चाहूल लागली असल्यामुळे नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड आणि नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एल आर वाजे यांच्याकडे बऱ्याच पैकी गावातील पाणी टंचाईचा प्रस्ताव आल्यामुळे काही दिवसातच बोअर व विहिरीचे अधिग्रहण करण्यात येईल अशी शक्यता आहे
नायगाव तहसीलच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार धम्मप्रियाताई गायकवाड यांच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे यांच्या कर्तव्य कार्य प्रणालीतुन नायगाव तालुक्यातील खेड्या पाड्यातील जनतेकडे लक्ष असल्यामुळे यंदा पाणी टंचाईची परिस्थिती निर्मण होणार असे प्रशसानाच्या सूत्रानी सांगितले आहे
तालुक्यातील बऱ्याच पैकी गावात उन्हाची तीव्रता व उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली त्या अनुषंगाने नायगाव तहसील प्रशासन व पंचायत समिती प्रशासन यांच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येते आहे

0 Comments