नांदेड येथील रेल्वे स्टेशनवर शिवसेनेच्या कार्यकर्त्या कडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आहे
नांदेड येथे दिनांक १५ मार्च २०२४ सकाळी ठीक ८ वाजून ४५ मिनिटानी देवगिरी एक्सप्रेसने आल्याच्या नंतर ते प्रथम साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार घालणार आहेत त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार घालणार आहे
नांदेड येथील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार घालणार आहेत त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सुद्धा पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करणार आहेत
शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयाकडे प्रस्थान करणार आहे तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याचे सह संपर्क प्रमुख व नूतन नांदेड उत्तर व नायगाव विधानसभा मतदार संघाचे नूतन जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार तयारी चालू आहे

0 Comments