नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यां मध्ये व लालवंडी विभागात दिनांक २१ मार्च २०२४ रोजी सकाळी सहा ते सव्वा ६ वाजण्याच्या भूकंप जाणवला असल्याने नागरिक घरा बाहेर येऊन टीना पत्रे वाजत असल्याचे पाहून चक्कीत झाले असल्याची घटना आज घडली आहे
या संदर्भात नायगावचे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु फोन लागला नाही ग्रामीण भागात सकाळी सकाळी महिला सह पुरुष मंडळी घर सुद्धा हलली असल्याचे सांगितले आहे
नायागांव तालुक्यातील लालवंडी विभागात मोठा आवाज झाला असल्याचे सांगण्यात येते अनेक घरावर वानर उड्या मारत आहेत की काय म्हणून लोक सकाळी सकाळी घरावर पाहू लागली परंतु प्रतिक्षात वानर नव्हते तो भूकंपाचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यामुळे लोक घरा बाहेर पडली आहे
तालुक्यातील लालवंडी येथील पत्रकार मारोती महाजनराव कोम्पलवार यांनी फोन करून माहिती अगोदर दिली आणि तिच चर्चा सकाळी सकाळी झाली आणि भुकंपाचा सोम्य धक्का बसला आहे
आता पर्यंत प्रशासना कडून सांगण्यात आले नसले तरी काही वेळात प्रशासना कडून सदरची माहिती प्राप्त होईल परंतु जनतेनी घाबरू नये असे एक मेकांना फोन नातेवाईक सांगत आहेत

0 Comments