Header Ads Widget

लोहा पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील सर्व महत्त्वाच्या पॉईंटवर पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केले पतसंचलन !!

                  माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा शहरातील मुख्य पॉईंटवर लोहा पोलिसांनी पतसंचलन करण्यात आल्याची माहिती पोनि चिंचोलकर यांनी दिली आहे 
लोहा पोलीस ठाण्याच्या मार्फत लोहा अंतर्गत शहरांमध्ये सि आर पी एफ राजस्थानची तुकडी पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार होमगार्ड त्यांच्या तर्फे रूट मार्च घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिली आहे 
लोहा पोलिसांनी कडून करण्यात आलेला रूट मार्च हा भविष्यात येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान येणाऱ्या निवडणुका या अनुषंगाने घेण्यात आला आहे
सिआरपीएफ राजस्थानची तुकडी ही नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणूक होई पर्यंत कायम स्वरूपी मुक्कामीराहणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ तत्काळ २० ते २५ मिनिटांत पोलीस स्टेशनला पोहोचेल या बेताने तिची नेमणूक करण्यात आलेली आहे
समोर होऊ घातलेल्या निवडणुका ह्या फार पारदर्शक पणे व आचार संहितेचे उल्लंघन न होता निर्भीड वातावरणात झाल्या पाहिजे या हेतूने प्रशासना कडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली असून त्यासाठी लोहा पोलीस आता पासून तयारीला लागले आहे 

घेण्यात आलेला रूट मार्च लोहा शहरातील मुख्य रस्त्यावर भाजी मंडी चौक, मोंडा कमान, बस स्टॅन्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये घेण्यात आला आहे 

सदरचा रूट मार्च हा  १० ते ११ वाजेच्या दरम्यान घेण्यात आला असल्याची कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजला माहिती दिली आहे 

Post a Comment

0 Comments