Header Ads Widget

हिमायतनगर बसस्थानकात प्रवाशाला कोरड पाण्याविना प्रवासाची बेहाल राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी झोपा काढताहेत का ?

         हिमायतनगर : नागोराव शिंदे - 
हिमायतनगर शहरातील दोन गाळ्यात बसलेले बसस्थानकातील सुविधेचा फार बोजवारा नेहमीच उडालेला आहे. शहरात पाणीटंचाईमुळे प्रवाशांच्या घशाला कोरड पडलेली आहे

दोन गाळ्यातील बसस्थानकात केवळ पाणी नसल्याने लहानमुले, वृद्ध प्रवाशांचे प्रचंड बेहाल होत असून, प्रवासी वर्गात उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने, तीव्र नाराजी व संताप येथील आगार प्रमुखा विषयी व्यक्त होत आहे

शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी शालेय विद्यार्थी, लहान मुलेंमुली, वृद्ध नागरिक प्रवास करीत असतात. दररोज तेलंगाना, विदर्भ व मराठवाड्यातील प्रवासी ये-जा करतात. शहरात कडक उन्हाळा सुरु आहे

लहान मुलें मुली सह, वयोवृद्ध महिला, पुरुष प्रवासानी या बसस्थानकात मोठी गर्दी नेहमीच दिसून येत असते. ग्रामीण भागातुन व ईतर तालुक्यातुन दररोज प्रवासी खाजगी वाहनाने ये-जा करतात. बसस्थानकात नेहमी रात्रं दिवस अनेक वाहनाची मोठी वर्दळ चालू असते.

ग्रामीण भागासह नजीक तेलंगणातील निर्मल, म्हैसा, कुबेर, विदर्भातील बोरी, चातारी, ढाणकी, बिटरगाव तसेच ईस्लापूर, शिवणी, आप्पारापेठ, जलधारा, बोधडी बु. पोटा, सोनारी फाटा, कामारी बिरसणी येथुन शालेय विद्यार्थी व कामानिमित्त आलेले वयोवृद्ध नागरिक यांना पिण्याच्या पाण्याची समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागत आहे

शहरातील बसस्थानकात पाण्यासाठी कोणतीही सोईसुविधा उपलब्ध नसल्याने, प्रवासी वर्गाचे मोठे हाल होताना दिसून येत आहे

बसस्थानक परिसरात दोन ते चार पाणी शुद्धीकरण मशीन बसवुन, प्रवाशांना शुद्ध व थंड पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग विभाग नांदेड व नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर यांनी अद्याप या विषयी कोणताही  ठोस निर्णय घेतला नाही

ऐरवी नगरपंचायत कार्यालय सिंमेट नाली, रस्ता आदी विकास कामावर लाखो रुपये खर्च करुन, गरज नसताना निधी देऊन दोन दोन वेळेस कामे दाखवुन बिल्ले उचलून घेतले जातात. परंतु शहरात शुद्ध पाणी मशीन केंद्र उभारण्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नसतात. ही गोष्ट दुर्दैवी आहे

लांब पल्यावरुन आलेल्या प्रवासी वर्गाला बाहेरील खानावळीचा आधार घेत अशुद्ध पाणी पिऊन खानावळीचा धंदा मात्र तेजीत चालवला जातो. बसस्थानकातील प्रवाशांना विकतचे पाणी बॉटल घेऊन ती पिवावे लागत आहे.

याकडे एसटी महामंडळाचे आगार प्रमुख हदगाव व नगरपंचायत कार्यालयाचे जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित शुद्ध व थंड पाणी मशीन लवकरात लवकर बसविणे अत्यंत गरजेचे आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments