Header Ads Widget

शोशीयल मिडीयावर आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी त्या निलंबित पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या पत्रानुसार नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -


नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क

नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा
निवडणूक आचारसंहिता पथक प्रमुख लक्ष्मण पिता रामा वाजे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यांनी समक्ष पोलीस स्टेशन नायगाव येथे हजर होऊन असे सांगितले आहे

की दिनांक २८ मार्च २०२४ रोजी माझी ड्युटी पंचायत समिती नायगाव येथे गट विकास अधिकारी म्हणून तसेच निवडणूक आचारसंहिता पथक प्रमुख म्हणून असताना मला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी १६ नांदेड लोकसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांनी लेखी पत्र व सीडी व्हिडिओ क्लिप दिल्या वरून लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ अन्वे संदर्भ क्रमांक निवडणूक

प्रधान्य तातडीने दिनांक २८ मार्च २०२४ मा.भारत निवडणूक आयोग यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा दिनांक १६ मार्च २०२४ रोजी जाहीर झाली आपल्या भारत देशा मध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे

त्या अन्वये प्रत्येक टिम टिपारमेंटचे कर्मचारी यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून वागावे व सोशल मीडियावर व्यक्त व्हावे असे निर्देश घालून दिले होते

असे असताना ही दिनांक २८ मार्च २०२४ रोजी दीड वाजण्याच्या सुमारास उमेश सिद्राम धोटे वय ४५ वर्षे व्यवसाय नोकरी वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती नायगाव खै.यांची ड्युटी पंचायत समिती नायगाव खै येथे संदर्भात क्रमांक ४ च्या निवडणूक अन्वे निवडणूक कामा करिता व इतर मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती

असे असताना ही त्याने जाणीव पूर्वक आदर्श आचारसंहिता कालावधीत शासकीय कर्मचारी पदाच्या वर्तणुकीचा भंग करून त्याने त्यांचे मोबाईल वरून स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर वायरल केला आहे

त्यांनी असे म्हटले आहे की मी लोकसभा २०२४ नांदेड १६ उमेदवार म्हणून उभे राहणार होतो परंतु नंतर माझे मन बदलल्या मुळे मी विधानसभा २०२४  महाराष्ट्राची स्वतः लढून हादगाव नायगाव मतदार संघातून उमेदवार उभे करणार आहे मतदार संघांमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदार संघा मध्ये विशिष्ट समाजाचे उमेदवार उभे करणार आहे

व ते मी निवडून आणणार असून यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे अशोभनीय विभागाशी वर्तन केली आहे व भारत निवडणूक आयोग यांचे चालू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उलघन केले आहे

व निवडणूक कर्तव्य काम काजाचा भंग केल्यामुळे त्यांचे विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम १२९,१३४ ( अ ) अन्वे माझी उमेश सिद्राम धोटे वय ४५  वर्षे राहणार नायगाव यांच्या विरोध माझी कायदेशीर फिर्याद आहे तरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी  फिर्याद दिल्या वरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments