सध्याच्या परिस्थिती मध्ये १६ लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी थोडक्यात चालू असल्यामुळे या अनुषंगाने निवडणूक विभागाने आदर्श आचार सहिंता जाहीर केली या आदर्श आचार सहिंतेचे जनतेसह शासकीय अधिकारी असो की कर्मचाऱ्यानी पालन करणे अंत्यत गरजे आहे
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत आदर्श आचारसंहिते काटेकोर पणे पालन करावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन ही के होते
शासकीय सेवेत असलेले नायागांव पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना राजकारणाचा मोह आवरता आला नसल्यामुळे त्यांच्यावर निलंबण्याच्या कारवाई बरोबर आता नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे
"आता सावधान " शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनो सध्याच्या परिस्थिती मध्ये लोकसभा निवडणूक असल्यामुळे व आचारसंहिता लागू केल्यामुळे फेसबुक असो की व्हाट्सअप असो अथवा इंस्टाग्राम असो यांच्यावर कोणत्या ही राजकीय पुढार्याचा प्रचार केला तर पडाल महागात अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
शासकीय अधिकारी असो की कर्मचारी यांनी राजकारणाच्या मोहात पडण्या पेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या काम काजात परिपूर्ण लक्ष देऊन कामे केले तरी योग्यच ठरेल परंतु ग्रामीण भागात काही कर्मचाऱ्याला राजकीय मोह असल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांचे तुंनतुने वाजविण्यात अनेक जन मग्न आहेत अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments