Header Ads Widget

राज्यात दारुबंदी व गुटखा नावालाच नूतन पिढी देशी दारूच्या आहारी - कायदा कडक होईल का ? -


 माधव पवार : नागोराव शिंदे - 

राज्या मध्ये शासनाने दारूबंदी व गुटखाबंदी केली असली तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये नूतन पिढी दारू व गुटख्याच्या आहारी जात असल्यामुळे शासनाच्या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन दारूबंदी यांच्यावर कडक कायदा होईल का ? असं सवाल जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे

आजच्या घडीला भारतात बिहार गुजरात मिझोराम नागालँड मणिपूर या राज्यात व लक्षद्वीप या गणराज्यात दारूबंदी राहते महाराष्ट्रात का दारू बंद होत नाही असा सवाल ही जनसामान्य माणसातून केला जात आहे 

भारतात एकूण चार राज्यात व एका केंद्रशासित प्रदेशात पूर्ण पणे दारू बंदी असून गुजरात  गेल्या ७ दशकां पासून गुजरात मध्ये दारूला राज्यात पूर्ण पणे बंदी ? असल्याचे सांगण्यात येत आहे

एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत देशी दारूचा महापूर होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी सध्याच्या परिस्थिती मध्ये नूतन पिढी देशी दारू व गुटखा सर्रास ग्रामीण भागात विक्री होत असली तरी निवडणूक कार्यकाळात शासन देशी दारू बंद करतील का ? सवाल केला जात आहे

नागालँड मध्ये गेल्या ३ दशका पासून म्हणजेच १९८९ पासूनच राज्यात दारूला पूर्ण पणे बंदी असून तिथे अवैध रित्या तिथे दारू तस्करी होत असल्याचे नेहमीच आढळते असे सांगण्यात येते आहे




Post a Comment

0 Comments