Header Ads Widget

नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांच्या हस्ते हत्तीरोग निर्मूलन मोहिमेचे उद्घघाटन !!

           माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तहसील कार्यालयाच्या कर्तव्यदक्ष महिला तसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांच्या हस्ते हत्तीरोग निर्मूलन मोहिमेचे उद्घघाटन करण्यात आले असून सदरचा कार्यक्रम हा नायगाव येथील बूथवर घेण्यात आला आहे
नायगाव तालुक्यातील निवडलेल्या लोकसंख्येच्या सर्व लाभार्थ्यांना गरोदर माता दोन वर्षाखालील बालके अति गंभीर रुग्ण सोडून सर्व वयगटानुसार डीईसी व अल्वेडाझोल गोळ्याची मात्रा खाऊ घालण्याची आहे

सदरील गोळया आपल्या घरातील आरोग्य विभागाची अशा अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी दिनांक २७ मार्च ते ५ एप्रिल २०२४ रोजी पर्यत डीईसी अल्वेडाझोल गोळया घेऊन येणार आहेत
सदरच्या गोळया येणाऱ्या कर्मचाऱ्यां समोर घ्यावेत असे आवाहन नायगावच्या महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी केले आहे

नायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ नाईक आरोग्य अधिकारी डॉ एस सी पटवेकर आदी यावेळी उपस्थित होते 




Post a Comment

0 Comments