नायागांव तालुक्यातील मौजे सूजलेगाव येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक व सेवा निवृत्त चौकेदार स्व सटवाजी लक्ष्मणराव सूर्यकार यांचे दिनांक २३ मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजता निधन झाले ते ९५ वर्षाचे होते ते शांती निकेतन विद्यालय रुई बु येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रदीप सूर्यकार यांचे ते वडील होते.
बाबा मला तुझी आठवण रोज येते, मी स्वत:शी झगडताना मला मदत करणारा कोणीही नाही मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही असे त्याचे मुलं म्हणत आहे
आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो, हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो.
तालुक्यातील सुजलेगाव दिनांक २४ मार्च २०२४ रोजी दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात येत असून त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले व चार सुना नातू पंतू असा त्यांचा मोठा परिवार आहे.

0 Comments