राजकारणात या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करणे म्हणजे हे राजकीय पुढार्यासाठी व नेत्यासाठी नवीन नाही पक्ष बदलण्यात आला म्हणजे विचाराची देवाण घेवाण बदलत नाही तात्पुरत्या स्वरूपासाठी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतात आणि मूळ पक्षात काही कालांतराने परत येतात यात काही शंका मानन्याचे कारण नसते कारण हा राजकीय खेळखंडोबा आहे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी त्यांची विचारधारा विकासात्मक असू शकते परंतु विरोधी पक्षाला एकमेकांवर टीका शस्त्र सोडण्यासाठी चांगली संधी मिळत असते तशाच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपा पक्षात प्रवेश केला आहे
एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकां मध्ये विरोधकांनी पक्ष बदलीची संधी घेऊन टीका शस्त्र सोडतील यात काही शंका नसली तरी खासदार अशोकराव चव्हाण हे चांगल्या नेतृत्वाचे असल्यामुळे टिकेला फार असे महत्त्व देत नसले तरी विरोधक सदरच्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात टिकेचा सर्रास वापर केल्या शिवाय सोडणार नाहीत असे सध्याचे चित्र स्पष्ट आहे

0 Comments