Header Ads Widget

नांदेड लोकसभेची निवडणूक दोन तगड्या पैलवानात होणार ? रण मैदानी हम भी कुछ कम नही !!

           माधव पवार
अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

त्यास तोडीस तोड काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचा उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडे एकमेव अर्ज केला असल्याने या नांदेड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून चव्हाण हे निश्चित आहेत

राज्याच्या राजकारणात व राजकीय वर्तुळात आणि नेते मंडळीं मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी लोकसभेच्या निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर व माजी आमदार वसंतराव चव्हाण ह्या दोन तगड्या पैलवानात येणाऱ्या लोकसभे मध्ये रणसंग्राम चांगलाच गाजणार आहे

भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर व माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासाठी ह्या दोन्ही पक्षांचे नेते मंडळी विजयी करून घेण्यासाठी मोठे प्रयत्न करणार असल्याचे जनते मधून स्पष्ट बोलल्या जात आहे

या नांदेड लोकसभा निवडणुकी मध्ये या सगळ्या पैलवानात लढत होणार असल्याने हम भी कुछ कम नही या दोन्ही तगड्या पुढाऱ्यां मध्ये वाटत असावे असे जनतेतून बोलल्या जात आहे 

काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर काँग्रेस पक्षाला खिंडार पडली असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत असली तरी सदरच्या राजकीय पुढार्‍या समोर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा नक्की भेट भेडसावणार आहे

काँग्रेस पक्षाला पडलेली खिंडार ही जनता भरून काढणार असल्याची जागोजागी चर्चा होत असून तशी काँग्रेस पक्षाला खिंडार म्हणता येणार नाही कारण जनतेचा दरबार खुला असल्यामुळे मतदाराच्या माध्यमातून या तगड्या पैलवानाचे भवितव्ये खुलणार असल्यामुळे हे दोन्ही तगडे पैलवान लोकसभेच्या रिंगणात दिसणार आहेत 

Post a Comment

0 Comments