राज्यातल्या अजब सरकारचा गजब कारभार असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे बँक खाते असून सुद्धा त्या बँक खात्या मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम व पंतप्रधान सन्मान योजनेचे आणि मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या योजनेचे बँक खात्यात रक्कम जमा होत नसल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पोस्ट खात्या मध्ये खाते खोलण्यासाठी प्रयत्न करीत असताना सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या हाताचा ठसा येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे
सरकार केवायसीच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांना आलेले शासनाचे अनुदान व पंतप्रधान सन्मान योजनेसह मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी काढलेली योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये २००० हजार रुपये टाकण्याची घोषणा केली परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यात केवायसी होत नसल्यामुळे सदरची रक्कम पडत नसल्याने शासन यावर काही तरी उपाय काढला पाहिजे असे शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे
शेतकऱ्यांचे बँकेत खाते असून अनुदानासह पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचे पैसे पडेनात व पोस्टात खाते उघडताना अंगठा येईना शेतकऱ्यानी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे

0 Comments