Header Ads Widget

हैद्राबादच्या विमानतळावर शेतकरी नेते कवळे गुरुजी यांचे धडाकेबाज स्वागत !!

            माधव पवार
राजकीय घोडेबाजार बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारा नेता म्हणजे कवळे गुरुजी यांचे आंध्र प्रदेशातील हैद्राबादच्या विमान तळावर भाजपाच्या कार्यकर्त्या कडून धडाकेबाज स्वागत करण्यात आले असल्याची माहिती आहे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ते मुंबई येथे भाजपा पक्षात प्रवेश केला होता त्या नंतर त्यांनी मुंबई येथून हैद्राबाद येथे आले असता त्यांच्या चहात्याने विमान तळावरच त्यांचे जंगी स्वागत केले आहे

सध्या भाजपा पक्षात प्रवेश केलेले कवळे गुरुजी हे राजकारणात जरी उतरले असले तरी ती शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय महत्त्व देऊन ऊस उत्पादक शेतकरी असो की नव तरुण वर्ग असो त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी त्यांची नेहमी प्रयत्नशी असतात अशा या शेतकरी नेत्याचे स्वागत हैद्राबाद येथे करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments