Header Ads Widget

कुंटूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचे २००० रुपये कधी पडणार ?

          माधव पवार
पंतप्रधान सन्मान योजना मुख्यमंत्री शेतकरी कल्याण योजनेच्या अंतर्गत मिळणारे प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता इतर बँके मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पडले आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात सदरचे हप्ते पडले तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन हजार रुपयाचे हप्ते पडतच नसल्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे

केंद्र सरकार व राज्य सरकारने मोठ्या थाटाने पंतप्रधान सन्मान योजना व मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेची मोठी अंमलबजावणी करण्यात आली असली तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर येथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाचे पैसे का पडत नाहीत असा प्रश्न शेतकऱ्यातून सरकारला विचारला जात आहे

राज्यातल्या दळभद्री सरकारने केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांना आलेले अतिवृष्टीची नुकसान भरपाईची घोषणा करीत तुटपुंजी मदत जाहीर केली असली तरी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाचे अद्याप अनुदान पडले नसल्याने शेतकरी कमालीचे संतापले आहे

राज्यातले सरकार शेतकऱ्यांचा मोठा करत असल्याचे भासवतात परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम आलीच नाही कारण शेतकऱ्यांचा अंगठा येत नसल्याने शासन पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यासाठी चाल ढकल करीत आहे 

 

Post a Comment

0 Comments