नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात रात्री व बे रात्री बाहेर तालुक्यातून अवैध रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहना बरोबर प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकून अवैध मुरूमाचे उत्खलन तालुक्यात केल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे
तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असे प्रकार आढळून आल्यास त्या अवैध धंद्याला मुळीच थारा दिला जाणार नसल्याचे नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसिलदार धम्मप्रियाताई गायकवाड यांनी सांगितले आहे
महसूल प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे प्रशासनातील कर्मचारी अशा बाबीकडे कटाक्षपणे लक्ष ठेवून असल्याने तशा अवैध रेती उत्खलनाला व मुरुम उत्खननाला मुळीच थारा दिला जाणार नाही व त्यांची गैय केली जाणार नाही असा कडक इशारा नायगावच्या महिला तहसीलदार धम्म प्रियाताई गायकवाड यांनी दिला आहे
जो कोणी महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धुळ टाकून असे अवैध पणे उत्खलन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे
काही दिवसा खाली नायगाव तहसील प्रशासनाचा पदभार स्वीकारल्या पासून सदरच्या महिला तहसीलदार यांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांना चांगल्याच प्रकारची शिस्त लावली असल्यामुळे सदरचे महसूल प्रशासन अतिशय चौखपणे काम करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments