Header Ads Widget

श्रावणबाळ संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना चार दिवसांमध्ये खात्यावर मानधन जमा होणार पल्लवी टेमकर

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 
हिमायतनगर   येथे नव्याने आलेल्या तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार श्री गोपाळराव हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ३५४०लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर श्रावणबाळ संजय गांधी अधि योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत्या चार दिवसांमध्ये महिनेवारी मानधन जमा होणार असल्याची माहिती वरील यंत्रणेवर काम करणारे हिमायतनगर तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून एम झेड सिद्दिकी यांनी दिली आहे 
सविस्तर असे की हिमायतनगर तालुक्यामध्ये श्रावण बाळ संजय गांधी दिव्यांग अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर मानधन जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तालुक्यातील सर्व निराधार यांना आधार देण्याचे काम या योजनेच्या यंत्रणेवर काम करणारे तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून एम झेड सिद्दिकी आणि त्यांचे सहकारी आकाश गुंडेकर यांनी अहोरात्र  मेहनत घेऊन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला वरील लाभार्थ्यांच्या खात्यात थेट मानधन जमा करण्याची प्रक्रिया या पदावर कार्यरत झाल्यापासून तारखेच्या अगोदर लाभार्थ्यांना मानधन वाटप करण्याचे काम अव्वल कारकून सिद्दिकी करीत असल्याची चर्चा लाभार्थ्यातून ऐकव्यास मिळत आहे याबाबत तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून आलेली मदत तात्काळ कशी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता येईल यासाठी आम्ही तत्पर आहोत अशी प्रतिक्रिया नायगाव फास्ट न्यूज शि बोलताना सिद्दिकी यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments