नायगाव पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे रुई बु येथील गेल्या ३० ते ४० वर्षाखाली या विभागा मार्फत बांधकाम करण्यात आले होते सदरचे बांधकाम करण्यात आल्याच्या नंतर सदर विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे येथील इमारती मध्ये पावसाळ्यात व हिवाळ्यात उन्हाळ्या मध्ये या ठिकाणी माणसं राहण्या ऐवजी जनावराची वस्ती बनली आहेतालुक्यातील रुई बु येथील पाठबंधारे विभागाच्या वसाहती मध्ये सदरील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे काटेरी झुडपे व सर्व घाण पसरली असताना सुद्धा सदरच्या अधिकाऱ्यांनी डोळे झाक करीत असल्याचे स्पष्ट चित्र रुई बु येथे दिसून येत आहे
रुई बु येथे घुंगराळा ते बळेगाव रुई रस्ता होत असल्याने बांधकामात काही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बालाजी भुजंगा पवार यांनी किरायाने घेतली पानपट्टी तात्पुरत्या स्वरूपा मध्ये पाटबंधारे विभाग वसाहात बु.येथे नेवून ठेवली होती परंतु सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वसाहती मध्ये अतिक्रमण केले म्हणून नोटीस बजावली सदरील नोटीसीचा आदर करीत सदर पानपट्टी काढून घेतली जाणार आहे
पाटबंधारे विभागाच्या जागे मध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून कुंपण लावली व त्या ठिकाणी पेरणी करत आहेत त्या शेतकऱ्यांना नोटीसी कधी देणार असा प्रश्न चर्चेला जात असला तरी अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना बारूच्या तळ्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही कारण या विभागाच्या नाकर्तेपणामुळे जागोजागी कॅनल ना दुरुस्त आहे

0 Comments