नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णुर येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याला आता ४ वर्ष झाले आहेत १४ फेब्रुवारी रोजी २०१९ रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला होता
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळ पास ४० जवान शहीद झाले होते त्या शूर वीरांना मानाची मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले आहे
दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी अजून ही भारतीयांच्या मनात तसेच आहेत. भारतानेही बदला म्हणून दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता सर्जिकल स्टाईकमध्ये दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उध्वस्त केले होते
तालुक्यातील कृष्णूर येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारत मातेच्या वीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
यावेळी विजय पाटील जाधव (सरपंच प्र) प्रबतराव पा.जाधव,लक्ष्मणराव पाटील जाधव,आशोकराव जाधव,बालाजी पा नावांदे,वसंतराव जाधव,भगवानराव जाधव,बालाजी पा.जाधव,विकास जाधव,कृष्णा जाधव व गावातील मोठ्या संख्येने जनता उपस्थित होते

0 Comments