Header Ads Widget

मनोज पाटील जरांगे यांनी दिलेल्या हाकला महाराष्ट्र बंदनांदेड ते हैद्राबाद राज्य मार्गावर पोलीसाचा कडेकोट बंदोबस्त !!

         माधव पवार
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर मनोज पाटील जरांगे यांनी दिलेल्या हाकला महाराष्ट्र बंद असल्यामुळे नांदेड ते हैद्राबाद
राज्य मार्गावर पोलीसाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार आर टी पवार व पो का अशोक घुमे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन केले त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार नांदेड येथील पथक नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर कृष्णूर एम आय डी सी येथील सदरच्या रस्त्यावर नांदेड येथून आले आहे

नांदेड येथील पथकातील ए एस आय पवार, बिट जेमादार आर टी पवार डी पी सी जैवळ, पी सी दहिफळे पी सी अशोक घुमे पी सी बोचरे एल पी सी प-हाड त्याच बरोबर माजी उच्च श्रेनी मुख्याध्यापक व्ही के कागडे कृष्णूरकर आदी यावेळी उपस्थित होते

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत  महाराष्ट्र बंदच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाण्याचे कर्तव्यदक्ष साहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी नांदेड ते हैदराबाद राज्य महामार्गावर जागोजागी कडेकोट बंदोबस्त लावला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले असून या सर्व बंद साठी सर्वत्र शांतता व व्यापारी गटाने सर्व दुकाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला आहे



Post a Comment

0 Comments