Header Ads Widget

या वर्षात आमच्या कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून शेकडो गोवंशास जिवनदान दिलेले आहे. किरण बिच्चेवार

हिमायतनगर  : नागोराव शिंदे - 

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या गोंवशा च्या तक्रारी मध्ये त्यादरम्यान आपण ४ हल्ल्यास गोरक्षक कार्यकर्ते यांनी तोंड दिले असुन.या मध्ये एका गोरक्षक कार्यकर्त्याचे बलीदान  सुद्धा गेले आहे.

तर दुसऱ्या कार्यवाही मध्ये एक गोरक्षक कार्यकर्ता तडीपार करण्यात आला तर दुसऱ्या गोरक्षक कार्यकर्त्याचा तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे.

याविरोधात पोलीस प्रशासनाने नेहमीच कसायांना आणि गोवंशाची कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात तस्करी करणाऱ्या कसायांना सहानुभूती दाखवली असल्याचे किरण बिच्चेवार यांनी म्हटले आहे.

या सर्व घटना लक्षात घेता पोलीस प्रशासनाची भुमिका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची राहीली असल्याने. याचाच विरोध म्हणुन आपण दि ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी मा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आपण सर्व गोभक्तांनी रझाकारी पोलीस प्रशासनाच्या विरोधात धरने आंदोलनात सहभागी व्हावे. असे एका निवेदनाद्वारे किरण सुभाष बिच्चेवार,नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख,विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत.यानि म्हटले आहे

Post a Comment

0 Comments