Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्यात सपोनि पाटील रुजु तर सहायक पोलीस निरीक्षक बहातरे यांची बदली !!

          माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करण्यात आल्या असल्यामुळे नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात उत्कृष्ट पणे कामगिरी करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कृष्ण हरी पाटील यांची नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असल्यामुळे त्यांनी नुकताच ठाण्याचा पदभार स्वीकारला असल्याची माहिती आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगल्या प्रकारे ठाण्याचा कार्यभार सांभाळला होता त्यांची बदली लातूर येथे झाली असल्याने त्यांच्या जागेवर भाग्यनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कृष्ण हरी पाटील यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात रुजू झाले आहेत 

तालुक्यातील कंटूर पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी या पूर्वी पुणे सोलापूर नागपूर नांदेड भाग्यनगर पोलीस ठाण्यात अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी बजावली होती 



Post a Comment

0 Comments