नायगाव विधानसभा मतदार संघातील तमाम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कसल्याच प्रकारचा विश्वास घात केला जाणार नाही आणि काँग्रेस पक्ष कदापी सोडणार नाही असे माजी आमदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्या नंतर आता नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी काय निर्णय घेतील या कडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे
काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व असलेले काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता त्याने असे सांगितले की ज्या काँग्रेस पक्षात आम्ही काम करतो त्या पक्षाला सोडचिट्टी देणार नसल्याचे ही प्राध्यापक प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज पर्यंतच्या कार्यकाळात नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी पक्ष बळकटीसाठी व पक्षाला चालना देण्यासाठी पक्षांच्या विचाराने एकदिष्टपणे काम केले आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघात मतदाराची नाळ माजी आमदार वसंतराव चव्हाण व प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या सोबत चांगल्या प्रकारे जोडली आहे

0 Comments