Header Ads Widget

हिमायतनगर शहरातील वैकुंठ स्मशानभूमीच्या अंतर्गत रस्त्यांचे आमदार जवळगावकरानी केले भूमिपूजन सार्वजनिक वैकुंठ स्मशानभूमी समिती कडून जवळगावकर यांचा केला सन्मान...

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

शहरातील लकडोबा चौक येथील सार्वजनिक वैकुंठधाम स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाचे काम येथील कमिटीने मागील ४ महिन्यापासून सुरू केले आहे

त्या कामासाठी हिमायतनगर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून जमेल त्या पद्धतीने लोक वर्गणी करून लोकसहभागामधून येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासह विकासाचे काम सुरू आहे

त्याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या नेत्याप्रमाणे खोटे आश्वासन न देता हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी येथील स्मशानभूमीला भेट देऊन वैकुंठ धाम स्मशानभूमीच्या गेट पासून दहन दाहिनीका पर्यंत असलेल्या सिमेंट काँक्रेट रस्ता करून देण्याचे नुसते आश्वासन दिले नाही

तर त्याकामाचे आज त्यांनी भूमिपूजन सुद्धा केले त्यामुळे बोलून नाहीतर करून दाखवनारा नेता म्हणून जवळगावकरांकडे पाहिले जात आहेत...

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील वैकुंठ धाम स्मशान भूमीची अनेक वर्षांपासून दैनीय अवस्था झाली होती त्यामुळे या परिसरात अंत्यविधीसाठी येणाऱ्या बाहेर गावच्या पाहुण्यांना व नागरिकांना मात्र मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता

त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकजुटीने एक सार्वजनिक बैठक घेऊन या स्मशानभूमीचां विकास करण्यासाठी सार्वजनिक समिती गठित करून विकास करण्याचा विडा उचलला त्या संकल्पनेनुसार त्यांनी शहरातील विविध सामाजिक ,राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडे या स्मशान भूमीच्या सुशोभीकरणासह विकास करण्यासाठी जमेल त्या पद्धतीच्या निधीची मागणी केली होती 

गावकऱ्यांनी पण नि संकोच पणे या स्मशान भूमीच्या विकासासाठी लोक सहभाग म्हणून जमेल त्या पद्धतीने निधी देत दर रविवारी ३ तास कमिटीने त्या ठिकाणी श्रमदान करून या स्मशान भूमिका चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू केले

त्यामुळे आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी  हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकरांनी  येथील स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केली व ह्या परिसरात अजून काय काय सुधारणा करावी लागेल असे कमिटी समोर बोलून दाखवले तेव्हा कमिटीच्या सदस्यांनी अंत्यविधी साठी येणाऱ्या पाहूणे मंडळींना सिमेंट रस्ता नसल्याची भावना व्यक्त करताच आमदारानी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली होती

येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीच्या गेट ते अंत्ययात्रा दैनिके पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्या लवकरच पूर्ण करून देऊ असे सांगत त्याचे  भूमिपूजन करून येथील स्मशान भूमी कमिटीला त्यांनी नुसते आश्वासनच दिले नाही तर काम करून दाखवले त्यामुळे येथील स्मशान भूमी कमिटीच्या सदस्यांनी कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे आभार व्यक्त केले

खोटे आश्वासन न देता काम करून दाखवणारा नेता म्हणून आमदार जवळगावकर यांची ओळख  ! अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल..

मागील काळात येथील स्मशानभूमीला एक कोटी रुपयांचा निधी देऊ ! अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आल्या होत्या पण एक कोटी मधील एक रुपया सुद्धा अद्याप येतील स्मशानभूमीला देण्यात आला नाही त्यामुळे असे खोटे आश्वासन न देता विकास कामे करून दाखवणारा नेता म्हणून जवळगावकर सोशल मीडियावर ट्रोल होताना आज पाहायला मिळाले....

Post a Comment

0 Comments