देशातील सामान्य, गोरगरीब व तळागाळातील लोकांचा विकास व्हावा व त्यांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन त्यांच्यासाठी विविध विकासाच्या योजना राबवीते. परंतु या योजना जनतेपर्यंत पोहोचतीलच असे नाही.तसा प्रयत्न कुणाकडून होत नाही असे दिसते
त्यातच सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे काही बोटावर मोजण्या एवढी लोक आहेत त्यापैकीच देवणी येथे अलीकडेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे हे एक होत
अनेक जिल्ह्यात,अनेक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार म्हणून सेवा बजावत आपल्याला आलेला अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी सोबत घेवून देवणी या महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या देवणी येथे अलीकडेच तहसीलदार म्हणून ते रुजू झाले.
अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले शिंदे साहेब यांनी प्रथम येथील कार्यालयातील कर्मचारी व स्थानिक लोकांचा अभ्यास करून या ठिकाणी कशी सेवा बजावावी याचा अभ्यास केला.सर्वसामान्य व गोरगरीबांच्या प्रश्नाची जान असल्याने त्यांनी प्रथम कर्मचारी वर्गाला शिस्तीत लावून काम करून घेण्यास सुरुवात केली.
आज काल कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. मुख्यालयी राहून लोकांची प्रश्न संवादातून सोडवता येतील.त्यांच्या समस्याही सुटतील म्हणून त्यांनी स्वतः मुख्यालयी राहून कार्यास सुरुवात केली आता कर्मचारीही त्यांचे अनुकरण करीत आहेत
त्यांची परिवर्तन करण्याची पद्धत ही सर्वसामान्य, गोरगरीब व तळागाळातील लोकांना दिलासा देण्यासारखी आहे.त्यामुळे अनेकांची कामे मार्गी लागत आहेत
अत्यंत अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात.देवणी तहसील कार्यालयात अनेक जागा रिक्त आहेत परिणामी एका एका कर्मचाऱ्यावर कामाचा बोजा पडतो आहे.कामे वेळेवर होत नाहीत
त्यामुळे तहसीलदार शिंदे साहेबांनी त्या त्या ठिकाणच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला विश्वासात घेऊन कार्य करण्याची शैली अवलंबली. त्यामुळे आता लोकांची कामे वेळेवर होत असल्यामुळे तालुक्यातील लोक समाधान व्यक्त करीत आहेत.रिक्त जागेमुळे पूर्वी तहसीलकार्यालयाकडून प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसत त्यामुळे लोकांच्या फेऱ्या व्हायच्या .आता सर्व प्रमाणपत्र लोकांना वेळेवर मिळत आहेत
शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लागणारी प्रमाणपत्रे वेळेवर मिळत असल्याने विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे. संगायो व इंगायो या गोरगरीब लोकासाठीच्या योजना व इतर अनेक योजना प्रभावीपणे राबवत असल्याने त्या लोकांना बराचसा दिलासा मिळाला आहे
तालुक्यातील अनेक प्रश्न भेडसावणारे असले तरी विकासाच्या बाबतीत असलेले प्रश्न सोडवण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.
प्रशासकीय सेवा बजावताना अनेक अडचणी येत असतात पण सर्व अडचणींवर मात करीत तहसीलदार शिंदे साहेबांनी प्रशासनातील कामे प्रामाणिकपणे करीत आहेत
अपुरा कर्मचारी वर्ग आणि प्रशासनातील काही विलंबाने होणारी कामे या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून तहसीलदार शिंदे साहेब हे अधिकारी व कर्मचारी वर्गाला विश्वासात घेवून तालुक्यातील जनतेचे कार्य चोखपणे पार पाडत आहेत
त्यामुळे ज्यांना शासनाच्या योजनांची माहिती नव्हती अशा लोकांना, लाभार्थ्यांना आता माहिती मिळत असून त्याचा ते लाभ घेत आहेत.शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत प्रामाणिक सेवा बजावणारे संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व तहसीलदार श्री.गजानन शिंदे साहेब यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देवूया !
शंकर बोईनवाड पत्रकार, उदगीर

0 Comments