महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यास क्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने बोर्डाच्या परीक्षात कॉपी करताना व कोणी कॉपी पुरविताना आढळून आल्यास त्यांची गैय केली जाणार असा इशारा लोहा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दिला आहे
सध्याच्या परिस्थिती मध्ये इयत्ता बारावी व त्यानंतर सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षा मध्ये कोणी ही विद्यार्थी शिक्षक संस्थाचालक मित्र नातेवाईक हे कॉपी करताना मिळून आल्यास किंवा कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देते वेळी मिळून आल्यास थेट पोलीस कार्यवाई करण्यात येणार आहे
महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैर व्यवहारांना प्रतिबंध घालण्यासाठी अधिनियम १९८२ कलम ७,८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सांगिले आहे

0 Comments