Header Ads Widget

पळसपुर डोलारी सिरपली येथील ग्रामस्थांनी उचलले साखळी उपोषणाचे लोकशाही हत्यार

हिमायतनगर : नागोराव शिंदे 

हिमायतनगर तालुक्यातून जाणाऱ्या पळसपुर ,डोलारी, शिरपली , शेलोडा,या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्याने या भागातील नागरिकांनी गुत्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये दहा दिवसात काम करा अन्यथा दिनांक १   मार्च  पासून काम सुरू करेपर्यंत साखळी उपोषणाचा उभारला आहे बडगा 

सविस्तर असे की हिमायतनगर पळसपुर डोलारी सिरपली या  रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे ७   १. २०२२ रोजी सुरुवात झाली आहे

आज पर्यंत हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम पुर्ण झाले नसल्यामुळे संबंधित गुत्तेदार आणि अधिकारी यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करून वरील तिन्ही गावच्या ग्रामस्थांना व प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे निदर्शनास येत असल्याने येथील गावकऱ्यांच्या वतीने आज कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना नांदेड यांना हिमायतनगर तहसीलदारामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे

त्या निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या तीन वर्षापासून हिमायतनगर पळसपुर डोलारी शिरपली या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम सुरू करायचा दिनांक ७ १ २०२२ रोजी पासून कामास सुरुवात झाली परंतु आज तीन वर्षापासून सदरील रस्त्याचे काम संबंधित गुत्तेदार व अधिकारी करीत नसल्यामुळे या रस्त्यावरील पुलाचे सर्व काम आधरवट अवस्थेत आहे

या रस्त्यावरून येजा करणे अत्यंत अवघड व जीवघेणे झाले असून सदरील काम जर येणाऱ्या आठ ते दहा दिवसात सुरु न झाल्यास आम्ही पळसपुर, डोलारी ,सिरपली, येथील सर्व नागरिक गावकरी यांच्यासह सामूहिक साखळी उपोषणास बसणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,

अन्यथा २९  २ २०२२ रोजी पर्यंत कामास सुरुवात न झाल्यास १मार्च रोजी उपोषणास हिमायतनगर येथील नडवा पुलाजवळ साखळी उपोषणास बसणार आहोत याची नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे निवेदन करते समस्त तिन्ही गावच्या ग्रामस्थांच्या विनंतीवरून आणि सर्वांच्या प्रश्नाचा विषय घेऊन ,

डॉक्टर मनोज राऊत डोलारीकर , नागोराव शिंदे पळसपुरकर ,साहेबराव कदम डोलारी ,बंडू उर्फ विठ्ठल आनंदराव पवार यांच्या सह्यानिशी आज हिमायतनगर तहसीलदार मार्फत कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे

Post a Comment

0 Comments