हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघि येथील समाजसेवा व पत्रकारिता क्षेत्रामध्ये अत्यंत तळमळीने आणि धडाडीने कार्य करत आपल्या कार्याची छाप समाजावर पाडणारे व्यक्तिमत्व म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गणपत गायकवाड होत.२ फेब्रुवारी ला त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष लेख..
हिमायतनगर तालुक्यातील पैंनगंगेच्या काठावरील असलेल्या दिघी या गावचे रहिवाशी असलेले गंगाधर गायकवाड हे स्वभावाने अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहेत.घरची परिस्थिती अत्यंत बिकट तरीही परीस्थितीशी दोन हात करत त्यांनी आपला संसारगाडा मिळेल ते काम करत ओढला आहे.
परिस्थिती कशीही असो समाजाला आपलं काहीतरी देणं आहे या भावनेने ते सदैव काही ना काही सामाजिक उपक्रम राबवतच असतात.यात रक्तदान असो की आरोग्यशिबीर असो की अजून काही ते अत्यंत तळमळीने करतात.
समाजसेवा करणे ही त्यांची उत्कट भावना आहे.दरवर्षी ते आपल्या मुलीच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करून गावाकऱ्यांचे व गावात भरणाऱ्या यात्रेला येणाऱ्या भाविक भक्तांची आरोग्य सेवा करतात.
तसेच महापुरुषांची जयंती पुण्यतिथी ला ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत असतात. यासोबतच इतर अनेक सामाजिक उपक्रम राबवितात. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करणे असो की कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणे असो ते अगदी मनाने करत असतात.
पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देत त्यांनी अनेक उपक्रम राबविले. पत्रकारितेत कार्य करताना त्यांनी अनेक पद भूषविले. यात महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघांचे तालुका उपाध्यक्ष, माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे तालुका उपाध्यक्ष, महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज (एम पी एल न्यूजचे ) मुख्य संपादक, दै श्रमिक लोकराज्य चे तालुका प्रतिनिधी आहेत.
पत्रकार गंगाधर गायकवाड हे दिघी गावच्या ग्रामपंचायत चे १०वर्ष सदस्य होते.
तसेच पत्रकारिता क्षेत्रात आल्यावर त्यांनी सामाजिक क्षेत्रावर भर देत समाजाच्या समस्या, व्यथा तळमळीने शासन दरबारी मांडल्या व त्याला न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे व करत आहेत
हिमायतनगर तालुक्यासह नांदेड जिल्हा तसेच संबंध महाराष्ट्रात प्रचंड जनसंपर्क असलेले पत्रकार गंगाधर गायकवाड यांनी कधीच जनसंपर्काचा आपल्या स्वार्थासाठी फायदा घेतला नाही. गरजू लोकांना मदत व्हावी त्यांच्यासाठी संस्थेमार्फत असो की इतर कशामार्फत असो ते मदत करत असतात. गोर गरीब व मागासलेल्या समाजाच्या समस्या मांडत त्याला पुरेपूर पाठपुरावा करत योग्य तो न्याय देण्याचे कार्य ते करत आहेत.
कोणतीही आशा न बाळगता व स्वार्थ न बघता ते सामाजसेवा व पत्रकारिता क्षेत्रात धडपडीने कार्य करत आहेत.
पत्रकार गंगाधर गायकवाड यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व दीर्घायुष्य लाभो.. निरोगी व सुख समाधानाचे आयुष्य लाभो.. आपल्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होओत तसेच आपल्या हातून अजून खूप समाजसेवा घडावी वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा..
शब्दांकन - नागोराव संभाजी शिंदे पळसपुरकर नायगाव फास्ट न्यूज हिमायतनगर प्रतिनिधी

0 Comments