Header Ads Widget

महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणाचा ज्वालंत प्रश्न सरकार समोर असताना लोकसभा निवडणुकीची घाई कशाला ? -

          माधव पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेत्यां मध्ये सध्याच्या परिस्थिती मध्ये लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागले असल्याने कमालीची चर्चा होत असली तरी या राज्यात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे

सदरच्या राजकीय नेते मंडळीला लोकसभा निवडणूका घेण्यासाठी एवढी घाई कशासाठी ? हा महत्त्वाचा प्रश्न सकल मराठा समाजाच्या समोर उभा आहे

राज्यातले सरकार अनेक महिन्या पासून मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला असताना सुद्धा आपल्या या राज्यातले सरकार चांगलेच धास्तावलेले दिसून येतात सदरचा सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून या राजकीय नेत्यांना लोकसभा निवडणूकीची घाई होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

महाराष्ट्र राज्यात सकल मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळत नसल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आली असल्यामुळे कोणताच राजकीय पुढारी गावात येण्यासाठी धजावत नसल्याचे दिसून येत आहे

राज्यात राजकीय ढवळा ढवळ झाली असल्यामुळे बडे बडे नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत असल्याने राज्यात चांगलाच खेळ खंडोबा मांडला जात आहे 


Post a Comment

0 Comments