नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या
नायगाव तालुक्यातील कुंटूर ठाण्याच्या हद्दीत अतिशय सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यां करण्यात आलेला रास्ता रोको शांततेत पार पडला असून कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी कुंटूर ठाण्याच्या हद्दीत चोक बंदोबस्त ठेवला होता अशी माहिती सपोनि पाटील यांनी दिली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घुंगराळा देगाव कुंटूर फाटा कृष्णूर काहाळा येथे रास्ता रोको शांततेत - सपोनि - रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी माहिती दिली आहे
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना रास्ता रोको करण्यासाठी सांगितले होते मराठा समाजाची या राज्यातील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाला आरक्षणा देण्यासाठी दिशाभूल करत असल्यामुळे सदरच्या रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते
जिल्ह्यातील नायगाव तालुक्याच्या कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर कसल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोक बंदोबस्त ठेवला होता सदरचा रास्ता रोको अतिशय शांततेत पार पडल्यामुळे पोलीसात समाधान व्यक्त वाटत होते असे त्यांच्या चेहऱ्याहून दिसून येते आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस अधिकारी म्हणून सपोनि रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी त्याने अतिशय कडे कोट बंदोबस्त लावून सर्वत्र पेट्रोलिंग केली असून सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णूर बिटचे जमादार आर टी पवार यांच्या पो.कॉ. अशोकराव घुमे यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी बंदोबस्त लावला आहे
बरबडा बीटचे ए एस आय नागोराव पोले यांच्यासह जमादार भार्गव सुवर्णकार जमादार सोनकांबळे जमादार खंधारे यांनी चांगलाच बंदोबस्त लावला आहे

0 Comments