Header Ads Widget

कुंडलवाडी कडून धर्माबाद कडे म्हेशी घेऊन जाणारा ट्रक बाभळी फाट्याजवळ पलटी ५ ठार २ जखमी ७ सुरक्षित चालक दवाखान्यात दाखल ?

        मारोती इबीतवार
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील कुंडलवाडी कडून धर्माबाद कडे १४ म्हेशी घेऊन जाणारा ट्रक धर्माबाद जवळील बाभळी फाट्याजवळ रात्रीच्या वेळी पलटी खाल्ला असल्याने यातील १४ म्हेशी पैकी ५ ठार तर २ जखमी आणि यातील ७ सात म्हेशी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे
नायगाव फास्ट न्यूजचे विशेष प्रतिनिधी मारोती इबितवार यांनी दिना ३१ जानेवारी २०२४ रोजी अंदाजे रात्री ११ वाजून ३० मिनिटानी झाल्याचे सांगण्यात येत आहे
जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथे म्हणजे फाट्यावर अनेक वेळा या ठिकाणी मोठमोठाले अपघात होतात या ठिकाणी प्रशासनानी रात्रीच्या वेळेला वाहन जाण्यासाठी दिशा फलक लावली नसल्यामुळे वाहन धारकाला दिशा समजत नसल्याने सदरचे अपघात होतात अशी चर्चा चालू आहे

धर्माबाद जवळील बाभळी फाटा येथे सदरचा ट्रक पलटी झाला असल्यामुळे ह्या ट्रकमध्ये चालकासह चार व्यक्ती असल्याचे सांगण्यात येते परंतु ह्या चार पैकी चालकाला मार लागला असल्यामुळे धर्माबादच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू ? असल्याचे सांगण्यात येते

कुंडलवाडी कडून धर्माबाद कडे म्हेशी घेऊन जाणारा ट्रक बाबळी फाट्याजवळ पलटी ५ ठार २ जखमी ७ सुरक्षित चालक दवाखान्यात दाखल ?  करण्यात आल्याची माहिती आहे 

Post a Comment

0 Comments