Header Ads Widget

व्यसनमुक्ती झाल्या शिवाय प्रगती अशक्य सोंडारे यांचे प्रतिपादन !!

        माधव पवार 
समाजातील तरुण पिढीने व्यसनमुक्ती केल्याशिवाय प्रगती होणार नाही म्हणुन प्रत्येक तरुण पिढिने व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे असे प्रतीपादन नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना केले.
दिनांक ९ फेब्रूवारी २०२४  रोजी मौजे लालवंडी येथील श्री राघवेंद्र स्वामी विद्यालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टिच्या वतीने प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

त्यावेळी समतादुत बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षतेपदी मुख्याद्यापक श्री वनंजे एस.बि.हे होते.यावेळी व्यसनाचे दुष्परीणाम यावर सखोल आणी मणोरंजनात्मक प्रबोधन समतादुत यांनी केले व बार्टिच्या योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमास स.शि.सब्बनवार व्हि एस.,सौ.भांजे ए एल , कदम पि एच,कदम के बि, सगरोळे ए सी,बावळे पि एस, ठाणेकर एस आर,सौ.रेनगुंटवार एस ए, सौ.हांनदेशवार आर एस.सह सर्व विद्यार्थी उपस्तिथ होते.

Post a Comment

0 Comments