नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथे १० ते २१ वयोगटातील मुली व महिलांची सभा ग्रामपंचायत चे सरपंच गजानन आनंदराव तोडे यांच्या अध्यक्षतेखाली
जि. प. शाळा अंतरगाव येथे घेण्यात आली प्रथमता राजमाता जिजाऊ व माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून बालिका पंचायत सभेस सुरवात करण्यात आले आहे
सभेमध्ये महिलांचे मनोबल व आत्मविश्वास वाढवण्यासाठी मार्गदर्शन करताना बेटीयो का आत्म विश्वास बढाये! बेटीयो का मनोबल बढाये!बेटीयो को आत्मनिर्भर बनाये!या वर सखोल मार्गदर्शन करून उपस्थित मुली महिला यांना काही समस्या /तक्रारी असतील तर तक्रार पेठी मध्ये टाकण्यास सांगितले आहे
मुलींनीही प्रतिसाद देऊन समस्या /तक्रार पेटीमध्ये टाकण्यात आल्या नंतर १० ते २१ वर्ष वयोगटातील मुली व महिला यांच्यातून बालिका पंचायत कार्यकारिणी निवडण्यात आली व सरपंच यांच्या अध्येक्षतेखाली बालिका पंचायत मार्गदर्शन समिती ची स्थापना करण्यात आली आहे
या सभेस आरोग्य सेविका, शाळेतील शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी मदतनीस,सी. आर.पि.मुख्याध्यापक ग्रामविकास अधिकारी शिक्षक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष,ग्रा. पं.केंद्र चालक ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले...

0 Comments