Header Ads Widget

विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षाचे गाव चलो अभियानाला सुरुवात !!

               माधव पवार
विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षाचे गाव चलो अभियानाला सुरुवात करण्यात आली असून भारतीय जनता पार्टी कडून राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत केंद्र शासन व राज्य शासन यांनी मागील सत्तेत आलेल्या कालावधी पासून आज पर्यंत केलेल्या कामाचा लेखा जोखा घरोघरी जाऊन भाजपाचे कार्यकर्ते यांनी सांगत आहेत

८९ मतदार संघातील सावरखेड मनुर रुई बु वंजारवाडी  या ठिकाणी दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक असलेले रुई बु. येथील निलेश भाऊसाहेब देशमुख यांच्यासह बालाजीराव हुसेना जंगलवाड भाजपचे नायगाव तालुका अध्यक्ष दत्तात्रेय पाटील ढगे

सावरखेड भाजपाचे तालुका उपध्याक्ष बालाजीराव मल्लकाजी गोसलवाड हरिदास पांडे रुईकर प्रभाकर पांडे पंढरी गंगातीरे विठ्ठलराव कोळगावे बाबू माधवराव चिंचलवाड दगडू टोकलवाड तुकाराम पाटील शिंदे माधव संभाजी पांडे मारोती बळवंत पाटील ढगे आदी यावेळी उपस्थित होते

काही महिन्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षाच्या वतीने गावचे लोक अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे

सदरची सुरुवात ही येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये या मतदार संघातील मतदार बांधवाचे नाते आमदार राजेश पवार यांच्याशी निकटचे असावे म्हणून गाव चलो अभियान चालू करण्यात आल्याच्या स्पष्ट चित्र दिसून येत आहे 


Post a Comment

0 Comments