Header Ads Widget

तीन दिवसांत रस्त्याचे काम सुरू करणार्या कंत्राटदाराने वीस दिवस उलटून गेले तरी काम सुरू झाले नाहीआमदाराच्या आदेशाला गुत्तेदारासह अधिकारी यांनी दाखवली केराची टोपली

हिमायतनगर : नागोराव शिंदे :-

हिमायतनगर.   तालुक्यातील पळसपुर डोल्हारी सीरपली पंतप्रधान सडक योजना अंतर्गत रस्त्याचे काम सुरू होऊन दोन वर्षे होऊन गेली परंतु आतापर्यंत काम पुर्ण झाले नसल्याने त्यासंदर्भात ग्राम पंचायत डोल्हारी येथे सोमवारी २१ जानेवारी रोजी सकाळी ११वा बैठक आयोजित केली होती या बैठकीला पळसपुर डोल्हारी सीरपली येथील ग्रामस्थां सह  हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर सहित शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते 

रस्त्याचे  काम लवकर पूर्ण करण्यासाठी मा.आ.माधवराव पा जवळगावकर यांनी संबंधित विभागाचे उप अभियंता  शासकीय कर्मचारी व गुत्तेदार  डोल्हारी ता हिमायतनगर येथे उपस्थित राहुन पळसपुर डोल्हारी सीरपली  रस्त्याचे अडचणी कंत्राटदाराने समजून घेऊन दोन तास चर्चा केली असता या वेळी. आमदार माधवराव पाटील जवळगावकर उप अभियंता शिंदे , कनिष्ठ अभियंता कानीदे  गुत्तेदार सिद्दीकी यांच्यात चर्चा करून गुतेदाराने तीन दिवसांत काम सुरू करण्याचे सांगितले खर परंतु आज 

वीस दिवस उलटून गेले परंतु कामाची  सुरवात झाली नसल्याचे दिसून येते.
 आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असे नागरीकातुन बोलले जाते
 तातडीने काम सुरू झाले नसल्यास येणार्या निवडणूकी वर बहिष्कार टाकण्याचा पळसपुर डोल्हारी सीरपली येथील नागरीक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे असे मदनराव पाटील सीरपली कर माजी वसंत सहकारी साखर कारखाना संचालक यांनी आमच्या प्रतिनिधिशि बोलताना सांगितले

Post a Comment

0 Comments