हिमायतनगर : नागोराव शिंदे -
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर शिवारात दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी अचानक गाराचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाल्याचे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन व्रत प्रकाशित करण्यात येत आहेजिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मागील वर्षां मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात मुस्कान झाली होती शासनाने पिक विमा व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही प्रमाणात जमा केली असली तरी असंख्य शेतकरी अनुदानापासून व जुन्या पासून वंचित आहेत म्हणजे त्यांच्या बँक खात्यात अनुदान पडले का ? आणि दिनांक ११ फेब्रुवारी रोजी अचानक गाराचा पाऊस झाल्यामुळे हैरान झाला असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले गहू ,चणा ,मका , टाळकी, करडई ,जेव्वारि , आधी पिके गारांच्या तडाख्यात सापडल्यामुळे आज दिनांक अकरा रोजी सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान अवकाळी पावसासह गारांचा पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याची पहावयास मिळत आहे याबाबत शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे की आज झालेल्या गारपिटीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी रास्त मागणी पळसपुर येथील बाबुराव वानखेडे यांनी नायगाव फास्ट न्यूज शि बोलताना केली आहे

0 Comments