Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काँग्रेस पक्षातून कोणत्या ही पक्षात गेले तर जनतेला काय फरक पडणार राज्य कर्त्यांने महाराष्ट्राचे वाटोळे केले ?

       माधव पवार
महाराष्ट्र ही संतांची भूमी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मायभूमीत गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेते मंडळीचा उभा नाच धिंगाणा चालत असल्याचे राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून या सर्व बाबीचा जनतेतून संताप व्यक्त केला असला तरी ह्या राज्यातले राजकारण अतिशय ढवळून निघाले आहे 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे गेल्या वर्षापासून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक वेळा रंगली ह्या राजकीय मंडळीचे नाट्य ड्रमा जनसामान्य शेतकरी व जनतेला चांगल्याच प्रकारे फसविल्या जाते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीत गेले काय राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले काय वंचित बहुजन आघाडी मध्ये गेले काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेले काय यांचा जनतेला काय फरक पडणार असे जनतेतून बोलल्या जात आहे

नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जर आमदारकीचा राजीनामा दिला असता तर सकल मराठा समाज मा.अशोकराव चव्हाण यांचा उदो उदो केला असता असे ही जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे 

या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता ही राजकीय नेता शेतकऱ्यांच्या हितासाठी कसल्याच प्रकारचे काम करीत नाही पदाच्या व मंत्र्याच्या पदाच्या मोहा मध्ये पडण्यासाठी राजकीय नेते मंडळीला पक्ष बदलण्याची वेळ येते या सदरच्या राजकीय पुढार्‍या कडून जनसामान्य माणसाच्या डोळ्यात धुळ फेकून मंत्रीपद भोगण्यासाठी डोके लढवावी लागते असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

या राज्यातल्या राजकीय पुढाऱ्यांनी सदरच्या राज्यात विकासाचे वाटोळे करून टाकले असल्यामुळे एका बाजूने शेतकरी हैराण तर दुसऱ्या बाजूने जनता हैराण झाले असून यांचे राज्य नाट्यमय चालूच असल्यामुळे यांच्या नाट्यमय खेळीचा जनतेवर कुठलाच परिणाम होणार नाही मा.अशोकराव चव्हाण भाजपात गेले काय अथवा काँग्रेस मध्ये राहिले काय जन सामान्य माणसांना या राजकीय पुढाऱ्यांचा काही उपयोग नसल्याचे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 


Post a Comment

0 Comments