देवणी : सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून श्री गजाननजी शिंदे यांच्याकडे पाहिले जाते आजपर्यंत देवणी तहसील कार्यालयासाठी अनेक तहसीलदार येऊन गेले मात्र कोणते ही तहसीलदार हे देवणीत मुख्यालयी राहिले नाहीत देवणीच्या विकासात आपले योगदान देता यावे म्हणून कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे हे प्रयत्न करीत आहे
तालुक्यातील लोकांच्या अडीअडचणी समस्या सोडविता याव्यात म्हणून गजानन शिंदे होता होईल तेवढा वेळ सर्वसामान्य लोकांना देत आहेत लोकांच्या समस्या ऐकून घेऊन प्रशासकीय पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत
त्यांचे उत्तम प्रशासन प्रचंड मोठा अनुभव अभ्यासू शांत सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून तहसीलदार गजानन शिंदे यांची आगळी वेगळी ओळख आहे
कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे देवणी तहसील कार्यालयात रुजू झाल्यापासून सर्व अस्थापणाला शिस्त लावण्याचे काम केले आहे महसूल विभागात बऱ्याच कर्मचारी यांच्या जागा रिक्त असतांना सुद्धा असेल तेवढ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या मितभाषी गोड स्वभावाने कर्मचाऱ्यां कडून काम करून घेण्याची पद्धत वेगळी आहे
सदरील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन कामे करून घेत आहेत देवणी तालुका हा कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेलं तालुका आहे
या तालुक्याकडे कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही देवणीत एम. आय. डी. सी. तसेच पाणी प्रश्न अनेक शासकीय कार्यालयाचा प्रश्न तालुक्यातील अनेक रस्त्याचा प्रश्न देवणी जातीच्या वळूचा प्रतिष्ठेचा प्रश्न त्यांचे संशोधन केंद्र दिवसा ढवळ्या पळविले गेले आहे
त्याकडे कोणात्याही राजकिय लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही ही जबाबदारी आत्ता प्रशासकीय अधिकारी यांचीच आहे देवणीच्या विकासासाठी काय हवं एवढे प्रशासनाकडे मांडण्याचे काम लोकांच्या भावना प्रशासनापर्यत पोहचविण्याचे काम आता प्रशासकीय अधिकारी यांनीच केले पाहिजे
राजकीय पुढारी हे आपल्या सोयीचे राजकारण करीत आहेत लोकांच्या हितसंबंधा विषयी काहीच देणं घेणं नाही लोकप्रतिनिधी वरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे प्रशासनात काम करणारे अधिकारी च लोकांचे हितसंबंध जोपासतील अशी लोकांची आशा अपेक्षा आहेत जे लोकांना हवं ते प्रशासनाकडे मांडव इतकीच अपेक्षा अधिकारी यांच्याकडून आहे
आत्ता लोकांचा समन्वय लोकप्रतिनिधीशी नाही अधिकारी यांच्याशी आहे कर्तव्यदक्ष अधिकारी शंभर टक्के प्रामाणिकपणे काम करतील यात शंका नाही गजानन शिंदे हे देवणी रुजू झाल्या पासून शालेय विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रमाणपत्र, महसूल बाबत असलेले सर्व प्रश्न निराधार निराश्रित लोकांसाठी राबविण्यात येणार आहेत
यात संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी भूमिहीन योजना यांचे अनुदान वेळेत वाटप करणे नवीन लोकांसाठी बैठक घेऊन नवीन संगायो इंगायो प्रकरणाला मंजुरी देणे हे काम तहसीलदार श्री गजानन शिंदे प्रामाणिक पणे करीत आहेत
त्यामुळे तहसीलदार गजानन शिंदे यांची लौकिकता वाढत आहे एक कर्तव्यदक्ष कार्यकुशल तहसीलदार म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते हे शंभर टक्के खरे असेच विधायक कार्य त्यांच्या हातून घडो ही सदिच्छा - गिरीधर गायकवाड -

0 Comments