Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी इसमाचा नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारा पूर्वी मृत्यू - ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

                माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मारताळा ते कल्याण टोल नाका राज्य महामार्गावर एका अनोळखी इसमाला कोणत्या तरी आज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर अवस्थेत नांदेड येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कृष्ण हरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बीटचे ए एस आय पोले जमादार भार्गव सुवर्णकार, जमादार सोनकांबळे यांनी सदरच्या अनोळखी इसमाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याने त्या अनोळखी इसमाची पटविण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मारताळा ते काहाळा या महामार्गावर दिनांक १५ फेब्रुवारी २०२४  रोजी वेळ ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान टोल नाका काहाळा रोडवर एक अनोळखी इसम वय अंदाजे ५० ते ६० वर्ष  यास कोणत्या तरी अज्ञात वाहन चालकाने धडक देऊन पसार झाला या धडकेत तो इसम गंभीर जखमी झाला आहे

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बीटचे ए एस आय पोले जमादार सुवर्णकार जमादार सोनकांबळे जमादार खंधारे यांनी त्या अनोळखी इसमास समास नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे दाखल केले आहे

परंतु उपचारा पूर्वीच त्या वक्तीस तपासून डॉक्टर यांनी मयत घोषित केले असून त्यांचा पंचनामा करून सदर अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्यासाठी सदरचे प्रेत शीतग्रह नांदेड येथे ठेवण्यात आले असल्यामुळे या व्यक्तीच्या संदर्भात कोणाला ओळख असल्यास व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन कुंटूर पोलिसांनी केले मोबाईल - ८१४९८७३५९१ / ९७६३०९७२२२ हा आहे
 

Post a Comment

0 Comments