हिमायतनगर : नागोराव शिंदे
नांदेड येथील आनंदनगर परिसरातील वरलक्ष्मी सेवाभावी प्रतिष्ठान संचलित संस्कार प्ले इंग्लिश स्कूलचा स्पेल- बी कॉम्पिटिशन कार्यक्रम ता.७जानेवारी २०२४वार रविवार रोजी तुलसी कम्फर्ट हॉटेल भाग्यनगर रोड येथे पार पडला आहे
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालय प्रमुख डॉ.जगदीश कुलकर्णी व डॉ.विद्या हंसराज पाटील होमिओपॅथी चिकित्सक यांचे प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापिका अनुराधा विजय खर्गे यांनी केले तर,स्पेल - बी कॉम्पिटिशनमध्ये सहभागी वर्ग नर्सरी, एलकेजी, युकेजी, पहिला वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला होता. यावेळी पालकांची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यश राहुल दुगावकर या विद्यार्थ्यांनी दिलेल्या दोन मिनिटाच्या वेळेत स्वतःचा परिचय,पाच प्रश्नाची उत्तरे,पन्नास शब्दाची स्पेलिंग व १ते ७पर्यंतचे पाढे म्हणून उपस्थित सर्व पालकांचे लक्ष वेधले. यावेळी सर्व विध्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिरा विठ्ठल बहादुरे यांनी केले
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिना पाटील,साक्षी देशमुख,रेखा मुंगल,शिल्पा आडेमोनिका बोधनकर,वंदना पवार आदी शिक्षिकांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमानंतर उपस्थित पाहुणेमंडळी व पालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती,

0 Comments