दर्पणकारआचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात दर्पण दिन आणि पत्रकार दिन साजरा केला जातो. हीच बाब लक्षात घेऊन रविवारी येथील शासकीय विश्रामगृह हिमायतनगर येथे
हदगाव/हिमायतनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते शेख रफिक शेख मेहेबूब यांच्या हस्ते हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता
यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार व काँग्रेस कार्यकर्त्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर सर्व पत्रकार बांधवांना शेख रफिक शेख मेहबूब यांनी मोठी भेट देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरासह ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींच्या वतीने हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या आतील एक दुकान पत्रकार भवनासाठी देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.
तसेच सामाजिक कार्यकर्ते शेख रफिक शेठ यांनी पत्रकार भवनात पत्रकारांच्या बैठकीसाठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर करण्याचे आश्वासन दिले. याबाबत ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, अनिल माधसवार,कानबा पोपलवार, गोविंद गोडसेलवार, सोपान बोंबीलवार यांनी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने स्वागत व आभार मानले आहेत. या शुभप्रसंगी पत्रकार गंगाधर वाघमारे, पांडुरंग गाडगे, असद मौलाना, अनिल मादसवार, दिलीप शिंदे, वसंत राठोड, चांदराव वानखेडे, सय्यद मन्नान, देवानंद गुंडेकर, शुद्धोधन हनवते, पांडुरंग मिरशे, धम्मपाल मुनेश्वर, , नागोराव शिंदे , अनिल भोरे , कृष्णा राठोड , मनोज पाटील , फहाद खान , आनंदा जळपते , नागेश शिंदे , दाऊ गाडगेवाड , विष्णू जाधव , दत्ता पुपलवाड , अंगद सुरोशे , गंगाधर गायकवाड , शेख खय्युम , धोंडोपंत बनसोडे ,लींगोजी कदम , पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments