भारत देशाचा पवित्र ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान असुन प्रत्तेकाचे हक्क,कर्तव्य,समजण्यासाठी घराघरात संविधान असले पाहिजे असे प्रतिपादन नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना केले.
दि. ८ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला आहे
महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी जिल्हा परीषद प्राथमीक शाळा सावरखेड येथे भारतीय संविधानाची मुल्ये यावर समता प्रबोधन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.अध्यक्षतेपदी सरपंच ईजगरे हे होते
यावेळी समतादुत यानी महापुरूष्यांचे समता विच्यार,संताची भुमीका यावर सखोल मार्गदर्शन करुन बार्टिच्या विवीध योजनांची माहिती दिली आहे यावेळी मुख्याद्यापक कानोले बि.पी.स.शि.ठक्करवाड,जानकर,ढगे,जाधव,कोंपलवार,किसवे,राजुरे सह किशन वाघमारे,हरी वाघमारे व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्तिथ होते.

0 Comments