राज्यातले दळभद्री सरकारच्या कार्यकाळात आर्थिक तिजोरी खणखणाट असल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान असो की पीक विमा मिळण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत असला तरी सरकार केवायसीचे नाटक करून शेतकऱ्याची दिशाभूल करीत असल्याचे सरळ सरळ शेतकऱ्यातुन बोलल्या जात आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे राज्यातले राज्य सरकार हे केवळ कानात बोलण्यातच पटाईत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कोणत्या ही समस्या सुटण्यास तयार नसल्याने शेतकरी राजा गल्ली बोळीत परेशान असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून यामुळे ग्रामीण भागातला शेतकरी सदरच्या सरकार वर वैतागला आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे सांगितले परंतु या सरकारचा शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारचा फायदा होत नसून शेतकरी मात्र पीक विमा येईल अनुदान येईल या अशा पोटी अनेक बँकेला जाऊन शेतकरी खात्याची चौकशी करत असल्यामुळे त्या खात्यात एक ही दबंडी अथवा एक रूपडा पडत नसल्यामुळे शेतकरी चांगलाच हैराण होत आहे

0 Comments