Header Ads Widget

आमच्या जनावरांच्या गाड्या तुम्ही का पकडता असं म्हणून हिमायतनगर येथील कसायांनी गोरक्षक किरण बिच्चेवार, यांना दिली जिवे मारण्याची धमकी

हिमायतनगर नागोराव शिंदे 

 नांदेड विभाग गोरक्ष प्रमुख, विश्व हिंदू परिषद आणि राहुल कारमोड जिल्हा सहगोरक्षा प्रमुख यांना दिनांक २६ जून २०२३रोजी सायंकाळी परमेश्वर कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या दुकानात येऊन शेख जावेद शेख नबी साहेब याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 
याविरुद्ध हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४६७/२०२३ दिनांक २७/१२/२०२३रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अनुषंगाने नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख , किरण बिच्चेवार यांनी  जिल्हाधिकारी नांदेड ,
. पोलीस महानिरीक्षक , . पोलीस अधीक्षक  यांना निवेदनाद्वारे हिमायतनगर येथील काही कसाई सातत्याने त्यांच्या मागावर असल्याचे आणि वारंवार पाठलाग करत असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. 

हिमायतनगर येथील कसाई अब्दुल हमीद अब्दुल कादर, शेख इलियास शेख नबीसाब, शेख एजाज इस्माईल कुरेशी  त्यांना जिवे मारण्याचा कट करत असल्याबद्दल  हे निवेदन देण्यात आलेले आहे.


या निवेदनामध्ये दिनांक २७/१२/२०१२ रोजी देखील एका गोवंशाच्या कारवाई दरम्यान अब्दुल हमीद अब्दुल कादर, शेख इलियास शेख नबीसाब व इतर समाजकंटकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हिमायतनगर पोलीस स्टेशनवर दगडफेक केली होती तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लाठीचार्ज केल्यावर वातावरण शांत झाल्याचे सुद्धा निवेदनामध्ये नमुद केले आहे.

 त्यानंतर दिनांक १६/४ /२०१६ रोजी  हिमायतनगर तालुक्यातील वाशी येथे कारवाई करून जप्त गोवंश पोलीस स्टेशन हिमायतनगरला घेऊन येत असताना अब्दुल हमीद अब्दुल कादर आणि शेख इलियास शेख नबीसाब व शेख एजाज इस्माईल कुरेशी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून सदरील वाहनातील गोवंश उतरून त्या ठिकाणी म्हैस वर्गीय जनावर गाडीमध्ये भरले आणि जमलेल्या जमावास किरण बिच्चेवार यांच्याविरुद्ध भडकवून जिवे मारण्याचा कट केला होता असेही निवेदनात म्हटले आहे.

तसेच दिनांक २९/०९/ २०१६ रोजी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक  संदीप डोईफोडे यांना दोन वाहनांची माहिती दिली होती, तरीही सदरील वाहन पोलिसांनी न पकडता हिमायतगरच्या दिशेने निघालेले होते, तेव्हा पोलीस गाडी येईपर्यंत सरसम आबादी येथे किरण बिच्चेवार यांनी संबंधित वाहन थांबून ठेवले होते त्यावेळी देखील अब्दुल हमीद अब्दुल कादर, शेख इलियास शेख नबीसाब व शेख एजाज इस्माईल कुरेशी आणि इतर पाच ते सात लोकांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन गोवंशासह वाहन घेऊन पसार झाले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

दिनांक ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी किनवट तालुक्यातील
शिवनी परिसरात दोन वाहनातून ज्यापैकी एका वाहनावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल होते हे लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा सहायक पोलीस निरीक्षक  शेवाळे यांनी त्याकडे दुर्लक्ष करून हिमायतनगर येथील शेख एजाज इस्माईल कुरेशी यांनी घेतलेले तीन गोवंश आणि दोन वाहन याच्यांवर कारवाई करण्यास , टाळाटाळ  केली होती याउलट आमच्याच गोरक्षक कार्यकर्त्यांना आपल्या पोलिस वाहनात डांबून ठेवले होते व कसायांना पळून जाण्यासाठी मुभा दिल्याचे या निवेदनात किरण बिच्चेवार यांनी म्हटलेले आहे. 

त्यावेळी हे सर्व प्रकार बघून  किरण बिच्चेवार यांनी तत्कालीन वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना बोलल्याने नाविलाजास्तव सकाळी ११ वाजता पकडलेल्या वाहनांवर सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल केला होता 

या गोष्टीचा राग मनात धरून शेख इजाज शेख इस्माईल व शेख जुनेद हे त्यांना मारण्याचा कट रचत असल्याची खात्रीलायक माहिती सतत मिळत असल्याची बाब किरण बिच्चेवार यांनी दिनांक ०४/०७/२०२३ रोजी  पोलीस अधीक्षक नांदेड यांना निवेदनाद्वारे कळवले होते.

त्यानंतर दिनांक १७/०६/२०२३ रोजी मौजे सरसम येथे नियमित गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणारे एक वाहन हिमायतनगरच्या दिशेने येत असल्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांना कळवले होते पोलीस गाडी येईपर्यंत वाहन थांबवले असता वाहनासोबत मोटरसायकलवर असलेला इफ्तिकार शेख इस्माईल याने फोन करून हिमायतनगर येथील  अब्दुल हमीद अब्दुल कादर, शेख इलियास शेख नबीसाब, शेख एजाज शेख इस्माईल व इतर ४०ते ५० लोकांना बेकायदेशीर रित्या बोलून " किरण बिचेवार अकेलाच है जल्दी आओ " असे फोन वरून सांगितले तेव्हा चाकू लोखंडी राड इत्यादी साहित्य घेऊन हिमायतनगर येथील ४० ते ४५ कसाई आणि समाजकंटक किरण बिच्चेवार यांना मारण्यासाठी आले होते, 

 वेळीच पोलीस गाडी आल्यामुळे किरण बिच्चेवार  हे बालम बाल बचावले होते.

हिमायतनगर येथील हे कसाई वारंवार किरण बिच्चेवार आणि त्यांच्या गोरक्षक कार्यकर्त्यांच्या मागावर राहून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न वारंवार करणे यामुळे जर त्यांच्या जीवित्वास काही बरे वाईट झाले तर त्यास वरील हे सर्व कसाई जबाबदार राहतील आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल असे  निवेदन काल दिनांक २८ रोजी पोलीस महानिरीक्षक नांदेड  जिल्हाधिकारी  नांदेड,  पोलीस अधीक्षक  नांदेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments