हिमायतनगर : नागोराव शिंदे
प्रवाशांच्या सोईसाठी ढाणकी येथुन हिमायतनगर गांजेगाव पळसपुर हिमायतनगर रेल्वे स्टेशन ला बस सेवा सुरु करण्यासाठी ऊमरखेड आगार व्यवस्थापक दिप्ती वड्डे मॅडम यांच्या कडे माधवराव मीटकरे प्रवाशी मंडळाच्या शिष्टमंडळाने एक निवेदन देण्यात आले होते माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाच्या मागणी चा विचार करून ढाणकी गांजेगाव पळसपुर हिमायतनगर रेल्वे स्टेशन हि बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला
दि २३,रोजीउमरखेड अगाराच्या एसटी बस सेवा ढाणकी येथुन सकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी सुटून हिमायतनगर येथे रेल्वे स्टेशन ला पाच वाजून २१मिनिटाच्या सकाळी आदिलाबाद परळी रेल्वे गाडीवर सकाळची एसटी बस सुरु झाली आहे
उमरखेड आगार प्रमुख कु दिप्ती वड्डे मॅडमयांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वाहतुक अधिक्षक श्री जगदिश मनवर यांनी हा निर्णय घेतला आहे
तरी सर्व प्रवाशांनी या सकाळच्या रेल्वेवर जाणाऱ्या बसचा ढाणकी गांजेगाव डोलारी पळसपुर येथील प्रवाशांनी लाभ घ्यावा अशी माधवराव मीटकरे प्रवाशी मंडळाचेअध्यक्ष शेख इरफान ढाणकी हिरासींग ठाकुर ढाणकी नाथा पाटील ढाणकी चांदराव वानखेडे पळसपुर माजी चेअरमन धनंजय मीटकरे सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे पळसपुरकर यांनी आवाहन केले आहे

0 Comments