Header Ads Widget

कुंटूर तांडा येथे वाघ ? दिसल्याची चर्चा असली तरी मुलांनी केला व्हिडीओ -

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर तांडा येथे वाघ ? दिसल्याची चर्चा होताना मोठया प्रमाणात ऐकावयास मिळत असून सदरचा वाघ की बिबट्या काही मुलांनी पाहून त्यांचा मोबाईलच्या कॅमेरा मध्ये कैद केले असून काही लोक तांड्या मधील वाघ असल्याचे संपर्क करून सांगितले असले तरी नेमका कोणता जंगली प्राणी असू शकतो यांचा अंदाज लागला नसला तरी तांड्यातील मुलांनी फारच दुरून तो प्राणी जाताना व्हिडीओ केला आहे
तालुक्यातील कुंटूर तांडा येथे दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान देगांव येथून कुंटूर तांडा येथे एक वाघ आला असल्याची मोठया प्रमाणात चर्चा होत असली तरी अशाच पद्धतीने काही वर्षा पूर्वी म्हणजे दहा ते बारा वर्षाखाली असाच वाघ दिसला असल्याची चर्चा रंगली होती परंतु वन विभागाचे अधिकारी चौकशी केली असताना काही दिसून आले नव्हते त्या प्राण्याचे ठसे सुद्धा पाहिले होते तेव्हा अधिकाऱ्यानी तडस असल्याचा दावा केला होता

या विभागात आज पर्यंतच्या काळात कुठे ही कधी वाघ अथवा चित्ता दिसला नाही तो प्राणी जंगली असल्यामुळे मुलांना वाघ असल्याचा झाला यात काही घाबरण्या सारखे काही नाही असे सांगण्यात येते आहे 

वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूर बिलोली यांच्या अंतर्गत काम करणारे वनरक्षक शिंदे यांना संपर्क करून सदरची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु काही कारणास्तव त्यांनी फोन उचला नसल्यामुळे नेमका कोणता प्राणी असावा यांचा अंदाज मात्र लागला नाही गंगनबीड येथील वनविभागाचे वन मजूर यांना ही संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असला तरी मी साहेबाना बोलाया सांगतो शिंदे यांना फोन केला आहे

Post a Comment

0 Comments