नायगाव तालुक्यातील रुई बु येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी साडे आकरा वाजता सर्व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले असून सदरच्या कार्यक्रमा निमित्त आनंद दिगंबर वाघमारे ( एस एस बी काँ ) यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आहे
तालुक्यातील रुई बु.येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन सभा घेण्यात आली व या ठिकाणी पंचशील त्रिशरण घेण्यात आले आज रात्री सदरच्या कार्यक्रमानिमित्त क्रांतीसुर्य गायन पार्टी रुई बुच्या भीम गीताचा अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचा कार्यक्रम रात्री ९ वाजता होणार आहे
रुई बु येथील क्रांतीसुर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा ढोलकी वादक माधव पवार / पार्टी प्रमुख राहुल वाघमारे तसेच गायक हणमंत वाघमारे, गायक बाबासाहेब वाघमारे हार्मोनियम राजेंद्र कदम, हार्मोनियम शेषराव कदम हार्मोनियम गणपत पवार, झाजंर मास्तर माधव रामजी पवार नागोराव पवार आदी व पत्रकार माधव पवार यांचा संचाचा कार्यक्रम होणार आहे

0 Comments