नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात रुई बु व रुई परिसरात थंडीच थंडी अशी लाट पसरली असल्यामुळे नागरिक हैराण झाले असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून प्रत्येक माणसाच्या अंगात स्विटर घातलेले दिसून येत आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात रात्री पासून आकाशातील ढगाळ वातावरण असल्यामुळे व पाऊस पडत नसल्याने थंडीची लाट पसरली असली तरी हरभरा पिकासाठी योग्य असली तरी कीटक त्यावर पडण्याची भीती शेतकऱ्यात वर्तवली जात आहे
नायगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यानी रुई बु व रुई परिसरात टाळकी ज्वारी हरभरा गहू आदी पिके घेतले असून यात सदरची पडलेली थंडी टाळकी ज्वारीसाठी पोषक असल्याचे शेतकऱ्याचे म्हणे असून दिनांक ६ डिसेंबर २०२३ ढगाळ वातावरणामुळे सूर्य पाहवयास मिळाच नाही असे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
तालुक्यातील रुई बु परिसरात दिवसाला शेकोट्या पेटवून शेकत आहेत व उबदर स्विटर घालून थंडीचा बचाव करीत असताना दिसून येत आहे

0 Comments