Header Ads Widget

चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेले पाच आरोपी लोहा पोलिसांच्या जाळ्यात पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची धडाकेबाज कारवाई - वरिष्ठा कडून कौतुक !!

          माधव पवार
लोहा पोलीस स्टेशन येथे दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री चार ते सहा च्या दरम्यान बायपास ब्रिज लोहा शिवारा जवळ चोरी करण्यात आली होती. सदर चोरीच्या घटनेमध्ये एकूण ३४ हाजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला होता. सदर गुन्ह्यातील एक आरोपी लोहा पोलिसांनी तात्काळ त्या दिवशी अटक केला होता.

मात्र त्यामधील इतर पाच आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यामुळे व एका आरोपीस अटक केल्यामुळे फरार झालेले होते.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी सहाय्यक फौजदार केंद्रे, पोना आनंद भाडेकर, पोलीस अमलदार रवी कुमार मडके यांचे पथक तयार करण्यात आले होते, सदर पथकाने आरोपीच्या मागे खबरी लावून त्यांच्या येण्या-जाण्यावर पाळत ठेवली होती.

दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सदर आरोपी हे बस स्टॅन्ड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर आरोपीतांच्या विरोधात सापळा रचून त्यांना आज रोजी लोहा येथे अटक केली असल्यामुळे वरिष्ठा कडून पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह लोहा पोलिसाचे कौतुक केले आहे 

आज रोजी कैलास नकलवाड वय १९ वर्ष कृष्णा गंठलवाड व १९ वर्ष पिंटू गंठलवाड वय ३२ वर्ष रमेश गंठणवाड वय 36 वर्ष संजय गंठलवाड व २८ वर्ष सर्व राहणार बालाजी मंदिराच्या मागे लोहा या आरोपींना अटक करून त्यांना माननीय न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते. या सर्व आरोपींना माननीय न्यायालयाने एमसिआर केल्यामुळे त्यांना आज रोजी नांदेड येथील जेलमध्ये दाखल करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार रवी कुमार मडके यांच्या विशेष कामगिरीमुळे सहायक फौजदार केंद्रे, पोना भाडेकर, माधव डफडे दत्तात्रेय शेळके, मोरे यांनी अभिनंदन पर कारवाई केली आहे 

Post a Comment

0 Comments